मन भावन श्रावण

Click here for August program letter

शुक्रवार तारीख 14 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता ‘मनभावन श्रावण’ हा कार्यक्रम करण्यात आला.सध्याची कोरोनाची आणि लॉकडाऊनची स्थिती पाहता प्रथमच झूम मंचावरुन हा कार्यक्रम सादर करण्यात आला. सुरुवातीला अध्यक्ष तेजस्विनी दाणी यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. संपूर्ण श्रावण महिन्यातले आपले सणवार , मंगळागौरीचे खेळ, आणि त्यावर आधारित गाणी असा हा कार्यक्रम होता. अर्चना जोशी , श्रुती झांबरे , संगीता शास्त्री आणि रागिणी बापट यांनी आपल्या सुमधुर आवाजात गाणी सादर केली. तेजस्विनी दाणी , आरती कुळकर्णी आणि रागिणी बापट यांनी निवेदनाची बाजू उत्तमरित्या सांभाळली. कार्यक्रमाची संकल्पना श्रीमती प्रज्ञा गोखले यांची होती. कार्यक्रमाच्या शेवटी सेक्रेटरी आश्विनी महाजन यांनी सर्वांचे आभार मानले. जवळपास 100 भगिनींनी झूमवरील या कार्यक्रमाचा आनंद घेतला.