वनिता समाजाच्या आजूबाजूच्या परिसरातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी १९७३ साली, श्रीमति इंदूताई राव यांच्या पुढाकारने बालवाडी सुरू करण्यात आली. गेली 45 वर्षे अव्याहत पणे हा उपक्रम सुरू आहे. २०१८-१९ मध्ये पटलावर ६२ मुले मुली – २.५ ते ४ वर्षे – या वयोगटातील आहेत. सध्या दोन वर्ग भरतात, नर्सरी आणि प्री-केजी. शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिले जाते. दोन शिक्षिका आणि दोन मदतनीस असे 4 कर्मचारी बालवाडीत कार्यरत आहेत.
बालवाडीची वेळ, सोमवार ते शुक्रवार, १० ते १ आहे. दिल्लीतील सरकारी शाळांचे सुट्टीचे वेळापत्रक मार्गदर्शनासाठी वापरले जाते.
मुलांना रोज सकस नाश्ता दिला जातो.
वर्षातून एकदा मुलांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाते.
मुलांकडुन दरमहा रू. १०० असे माफक शुल्क घेतले जाते.
शाळेसाठी देणगी द्यायची असल्यास आमच्याशी संपर्क साधावा. संपर्क साधण्यासाठी येथे क्लिक करा
https://ilaclar.eniyibloglar.com/https://viagrasatisi.blogkullan.com/